Operation Sindoor | भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झाले का? त्याची औपचारिक घोषणा कोण करते?  file photo
राष्ट्रीय

Operation Sindoor | भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झाले का? त्याची औपचारिक घोषणा कोण करते?

India Pakistan War | 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तान संघर्ष तीव्र झाला आहे. युद्धाची औपचारिक घोषणा कोण करतो आणि कशी होते, जाणून घ्या.

मोहन कारंडे

Operation Sindoor India Pakistan War |

दिल्ली :  भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता युद्धसदृश स्थितीत पोहोचला आहे.  भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ६ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पाकिस्तानने याला एक चिथावणीखोर कृत्य म्हणत सीमेवरील नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्कर याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. एकंदरीत, युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा अर्थ दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले आहे, असा होतो का? जर हो, तर त्याची अधिकृत घोषणा कोण करेल? जाणून घ्या सविस्तर...

युद्धाचे टप्पे समजून घ्या...

युद्ध अचानक सुरू झाल्यासारखे वाटत असले तरी, ते कोणत्याही आजाराप्रमाणे हळूहळू पसरते. जसे की ते राजकीय वक्तव्याने सुरू होते, ज्याचे मूळ काही घटनेशी असू शकते. जर आपण भारत आणि पाकिस्तानबद्दल सांगायचं झालं तर, जम्मू-काश्मीर मधील पहलगाम हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला मानला गेला. भारताने त्वरीत राजनैतिक पावले उचलली आणि पाकबरोबर काही करार मोडले. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यात आली. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले, याला ऑपरेशन किंवा मर्यादित लष्करी कारवाई म्हणतात.

यानंतरच होते युद्ध

युद्धात लढाई ही देशाच्या सीमेपुरती मर्यादित नसते; देशात कुठेही हल्ले होऊ शकतात. शत्रू कुठेही अचानक हल्ला करू शकतो. या टप्प्यानंतर, शेवटचा टप्पा म्हणजे अणुयुद्ध. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मोठ्या शक्ती पुढे येत असल्याने याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही पाकिस्तान ज्या प्रकारे दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे, त्यामुळे शक्यता आहे.

युद्धाची औपचारिक घोषणा कोण करतात?

  • भारतीय संविधानाच्या कलम ३५२ नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात.

  • राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात. जेव्हा भारताची सुरक्षा युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरीमुळे धोक्यात असते आणि राष्ट्रपतींना तशी खात्री झाली तरच ते घोषणा करतात. 

  • मात्र, ही घोषणा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच केली जाते. 

  • म्हणजेच प्रत्यक्षात युद्धाचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ घेते, ज्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश असतो.

  • आणीबाणीची घोषणा संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर ती सहा महिन्यांसाठी लागू राहते. 

  • गरज असेल तर लष्करप्रमुख, गुप्तचर संस्थांचा सल्ला देखील घेतला जातो.

भारत युद्धाची घोषणा का करत नाही?

  • भारत आणि पाकिस्तानमधील पहिले युद्ध काश्मीरवरून झाले. त्यावेळी पाकिस्तानी सैनिक जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले होते. पण दोन्ही देशांपैकी कोणीही युद्ध घोषित केले नाही.

  • साठच्या दशकात भारत-चीन युद्धातही असेच घडले. चीनने अचानक सीमेवर मोठी लष्करी कारवाई सुरू केली. कोणीही कोणतीही घोषणा केली नाही.

  • १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध सौम्यतेने सुरू झाले परंतु नंतर ते वाढू लागले. यावेळी देखील कोणत्याही बाजूने युद्धाची औपचारिक घोषणा करण्यात आली नाही.

  • १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध बांगलादेशवर झाले होते. १३ दिवस चाललेल्या या लढाईत भारताने विजय मिळवला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला, परंतु युद्धाची औपचारिक घोषणा झाली नव्हती.

  • भारतात आजपर्यंत युद्धे घटनांचा बदला म्हणून सुरू झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT