SHOCKING LIFT ACCIDENT  Pudhri
राष्ट्रीय

Shocking Lift Accident : लिफ्टचा अंगावर काटा आणणारा अपघात! दार उघडे असतानाच अचानक गेली खाली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, नागरिकांकडून व्‍यक्‍त होतोय तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

woman dies in lift accident : आंध्र प्रदेशातील ओंगोल येथील 'सूर्या टॉवर्स'मध्ये एका भयंकर लिफ्ट अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दार उघडे असतानाच लिफ्ट अचानक खाली गेल्यामुळे हा थरारक अपघात घडला. दरम्यान, या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नादुरुस्त लिफ्टमुळे नागरिकांच्या जिवाला असणाऱ्या धोक्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अचानक वेगाने खाली जाऊ लागली

मिळालेल्या माहितीनुसार, वनिता आपली मुलगी आणि नातवासोबत लिफ्टमध्ये गेल्या होत्या. मुलगी आणि नातू लिफ्टमधून सुरक्षितपणे बाहेर पडले. मात्र, वनिता बाहेर पडत असतानाच, दार उघडे असताना लिफ्ट अचानक वेगाने खाली जाऊ लागली.

लिफ्टमध्ये अडकल्या आणि गंभीर जखमी

इमारतीची लिफ्ट एवढ्या वेगाने खाली गेली की, काही समजण्याच्या आत घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या वनिता यांनी घाईघाईत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्या लिफ्टमध्ये अडकल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

उपचारादरम्‍यान मृत्‍यू

'सूर्या टॉवर्स'मधील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इमारतींमधील लिफ्टची सुरक्षितता आणि देखभालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नादुरुस्त लिफ्टमुळे नागरिकांच्या जिवाला असणाऱ्या धोक्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT