राष्ट्रीय

ओमर अब्दुल्लांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्नी पायल अब्दुल्ला यांच्यापासून घटस्फोट हवा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि विकास महाजन यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. 30 ऑगस्ट 2016 रोजी कौटुंबिक न्यायालयानेही ओमर यांची याचिका फेटाळून लावली होती.

ओमर आणि पायल यांचे लग्न 1 सप्टेंबर 1994 रोजी झाले होते. त्यांना झहीर आणि जमीर ही 2 मुले आहेत. 2009 पासून ओमर व पायल विभक्त आहेत. ओमर यांनी पायल यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप करून घटस्फोटाची मागणी केली होती; पण हे आरोप सिद्ध करणारे कुठलेही पुरावे ते न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत. ओमर व पायल यांचा प्रेमविवाह 1994 मध्ये झाला होता.

SCROLL FOR NEXT