Saharanpur Old Well Found | सहारनपूरला पाडलेल्या मशिदीच्या ढिगाऱ्याखाली आढळली जुनी विहीर 
राष्ट्रीय

Saharanpur Old Well Found | सहारनपूरला पाडलेल्या मशिदीच्या ढिगाऱ्याखाली आढळली जुनी विहीर

एमसीडी मुख्यालयात 'अभाविप'कडून तोडफोड

पुढारी वृत्तसेवा

सहारनपूर; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका वादग्रस्त मशिदीवर बुलडोझर कारवाई झाल्यानंतर रविवारी ढिगारा हटवताना खाली सुमारे २० फूट खोल आणि १.५ मीटर व्यासाची विहीर आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या या मशिदीवर शनिवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात सलग १६ तास बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करण्यात आली. रविवारी सकाळी कामगार घटनास्थळावरील ढिगारा हटवताना त्यांना जमिनीखाली एक दगडी स्लॅब दिसला. कटरच्या सहाय्याने हा स्लॅब कापून पाहिला असता त्याखाली सुमारे २० फूट खोल विहीर असल्याचे स्पष्ट झाले.

सुरक्षेच्या दृष्टीने विहीर झाकली

विहिरीमध्ये माती किंवा ढिगारा पडू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात त्यावर लोखंडी पत्रा टाकून ती सुरक्षित करण्यात आली आहे. परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून नागरिकांना तिथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पुरातत्त्व विभागाकडे तपासणीची मागणी

या शोधानंतर सहारनपूरचे उपविभागीय दंडाधिकारी सुबोध कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व आणि नेमके वय तपासण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही विहीर सुमारे १०० वर्षे जुनी असावी, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळी नळाने पाणीपुरवठा नसताना विहिरी हा पाण्याचा मुख्य स्रोत होत्या. अनेक जुन्या मशिदींमध्ये वजू (हात-पाय धुणे) आणि स्नानासाठी विहिरींचा वापर होत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT