राष्ट्रीय

Aishwarya Rai | ऐश्वर्या रायचे निंबूडा - निंबूडा गाणे ५ वी च्या पुस्तकात जसेच्या तसे : ओडीशा शिक्षण मंडळाच्या कारभारावर चहूबाजूंनी टीका

संगीत शिकवण्याऐवजी बॉलिवूडच्या आयटम साँग्स शिकवणार का? नेटकऱ्यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

Aishwarya Rai Nimbooda Nimbooda song : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील गाजलेले 'निंबूडा निंबूडा' ह संपूर्ण गाणे ओडिशातील शालेय पाठ्यपुस्तकात उडीया भाषेत छापण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणी ओडिशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील पुस्तकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेच्या या कारभारावर तीव्र टीका होत आहे.

या प्रकरणतील सविस्तर माहिती अशी की, ओडिशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता ८ वीच्या कला शिक्षण आणि ५ वीच्या इंग्रजी पुस्तकात बॉलिवूडची प्रसिद्ध गाणी आणि त्यांचे संपूर्ण शब्द अभ्यासक्रमाचा भाग म्हणून छापण्यात आले आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय हिच्यावर चित्रीत झालेले हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील 'निंबूडा निंबूडा' हे गाणे समाविष्ट करण्यात आले आहे.

इयत्ता ५ वीच्या कला शिक्षणाशी संबंधित असलेल्या 'मो संगीत जगत' या प्रकरणामध्ये राजस्थानी लोकगीत म्हणून 'निंबूडा-निंबूडा' या गाण्याचे संपूर्ण बोल छापण्यात आले आहेत. हे गाणे मूळचे लोकगीत असले, तरी १९९९ मधील 'हम दिल दे चुके सनम' या बॉलिवूड चित्रपटामुळे ते लोकप्रिय झाले होते. त्‍याशिवाय, 'मिशन काश्मीर' चित्रपटातील 'रिंद पोश माल' आणि 'बुंबरो बुंबरो' या गाण्यांचाही समावेश वेगवेगळ्या इयत्तांच्या पुस्तकांत करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांचा संताप

पुस्तकातील हे धडे समोर येताच सोशल मीडियावर युजर्स आणि पालकांनी शिक्षण मंडळाला धारेवर धरले आहे. ‘ओडिशातील विद्यार्थ्यांना राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ओडिया लोकगीते किंवा शास्त्रीय संगीत शिकवण्याऐवजी बॉलिवूडच्या आयटम साँग्स आणि डान्स नंबरचे शब्द का शिकवले जात आहेत?’ असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT