October Heat 2026 
राष्ट्रीय

October Heat 2026 | यंदाच्या ‘ऑक्टोबर हिट’ने तोडला १२५ जुना विक्रम : १९०१ नंतर देशात पहिल्यांदाच तापमानाचा उच्चांक!

ऑक्टोबर २०२६ महिन्याचे सरासरी तापमान राहिले ३२.६८ अंश सेल्सिअस, IMD चा रिपोर्ट

Namdev Gharal

October Heat यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेने उच्चांक नोंदवला असून, अन निनो चा परिणाम, कमी पर्जन्यमान इत्‍यादीमुळे या माहिन्याचे सरासरी तापमान ३२.६८ अंश इतके राहिले जे गेल्या १२५ वर्षात नोंदवलेले सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी एवढे तापमान १९०१ साली नोंदवले गेले होते. यंदाचे तापमान जे सामान्य तापमानापेक्षा १.०८ अंशांनी अधिक आहे. या ऑक्टोबरमध्ये उष्णतेने जुने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. IMD च्या ताज्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. हा विक्रम प्रामुख्याने दिवसाच्या कमाल तापमानाने केला आहे.

ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे हवेत गारवा जाणवू लागतो आणि उकाड्यापासून दिलासा मिळण्याची आशा असते. मात्र, यंदा देशातील उष्णतेने जुने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, कमाल तापमानाची सरासरी लक्षात घेतल्यास, १९०१ नंतर ऑक्टोबर २०२६ हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर ठरला आहे. सरासरीपेक्षा १.०८ अंश सेल्सिअसने अधिक उष्ण आहे. म्हणजेच, ऑक्टोबरमध्येही नागरिकांना दिवसा नेहमीपेक्षा जास्त उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या.

दैनंदिन जीवनावर परिणाम

ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमानात झालेली ही वाढ मान्सूनच्या माघारीनंतरही देशाच्या मोठ्या भागात उष्णतेचा प्रभाव कायम असल्याचे दर्शवते. सरासरीपेक्षा १.०८ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाणे हा केवळ आकडेवारीतील बदल नसून, त्याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये ऑक्टोबरमध्ये तापमान कमी होऊन हवामान आल्हाददायक होऊ लागते, तिथे उष्णता कायम राहणे ही चिंतेची बाब ठरली आहे.

आयएमडीनुसार ऑक्टोबरमधील या उष्णतेचा प्रभाव विविध शहरांमध्ये स्पष्टपणे जाणवला. महाराष्ट्रातील पुणे शहरात या महिन्यात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेले १४ दिवस नोंदवले गेले; गेल्या १२ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूची लवकर माघार, आकाशात ढगांची कमतरता आणि परतीच्या पावसाच्या गडगडाटासह होणाऱ्या सरींचा अभाव यामुळे दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT