NPS-Vatsalya, Budget 2024
अर्थसंकल्पात 'एनपीएस वात्सल्य' योजनेची घोषणा केली.  
राष्ट्रीय

Budget 2024 |आता मुलांच्या नावे सुरु करता येणार पेन्शन; अशी आहे NPS Vatsalya योजना

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी त्यांनी विविध घटकांसाठी घोषणा आणि तरतूदी केल्या. यावेळी त्यांनी 'एनपीएस वात्सल्य' (NPS-Vatsalya) योजनेची घोषणा केली. जाणून घ्या ती घोषणा कोणासाठी आहे, कोण पात्र असणार आहे आणि त्याचे स्वरुप काय आहे याविषयी. (Budget 2024 )

कोणासाठी वात्सल्य योजना आहे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज एनपीएस वात्सल्य' (NPS-Vatsalya) योजनेची घोषणा केली. ही घोषणा अल्पवयीन मुलांसाठी दीर्घकालीन बचत सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.

योजनेचे स्वरुप काय आहे?

'एनपीएस वात्सल्य' योजना लहान मुलांसाठी असून, वात्सल्य योजना लहान मुलांसाठी बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पालक आणि पालकांना मुलांच्या वतीने गुंतवणूक करण्यास परवानगी देईल. योजनेतील सहभागी अल्पवयीन मुल प्रौढ झाल्यानंतर त्याचे पालक संबधित खाते नियमित नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS -National Pension Scheme) खात्यात बदलू शकतात.

निर्मला सीतारामन यांनी रचला इतिहास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प (Budget 2024 ) सादर केला .

२०१९ मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पूर्ण-वेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केल्यापासून, सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह सलग ६ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. आज (दि.२३) त्या सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग ५ अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम त्यांनी मोडला.

SCROLL FOR NEXT