राष्ट्रीय

देशात चारपैकी तीन व्यक्ती ’नोमोफोबिया’ने ग्रस्त!

दिनेश चोरगे

आजमितीस अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन हेच त्यांचे विश्व बनलेले आहे. त्याविना आयुष्य अशी कल्पनाही त्यांना करवत नाही. हेच कारण आहे की, आजघडीला देशातील दर चार व्यक्तींपैकी तीनजण 'नोमोफोबिया'ने ग्रस्त आहेत. काऊंटरपॉईंट, ओप्पोने संयुक्तपणे केलेल्या एका पाहणीत हे वास्तव समोर आले.

'नोमोफोबिया' म्हणजे काय?

नो मोबाईल फोन फोबिया म्हणजे आपला मोबाईल आपल्यापासून दुरावेल, अशी सतत वाटणारी भीती. इंटरनेट बंद पडेल का, फोन हरवेल का, त्याची बॅटरी संपेल का, असे विचार 'नोमोफोबिया'ग्रस्त व्यक्तीच्या डोक्यात सतत घोंघावतात. त्यातून अनेकांना असहाय समजणे, चिंताग्रस्त होणे, तसेच भावनिक अस्वस्थतेलाही सामोरे जावे लागते.

       हेही जाणून घ्या….

  • महिलांच्या तुलनेत 82% पुरुषांना सतावते मोबाईलबद्दलची चिंता
  •  42% केवळ मनोरंजन, सोशल मीडियासाठी वापरतात स्मार्टफोन.
  • निम्म्या लोकांना दिवसातून दोनदा चार्ज करावा लागतो फोन.
  • 87% लोक फोन पूर्ण चार्ज झाल्यानंतरच त्याचा वापरतात.
  • 92% आपला फोन पॉवर सेव्हिंग मोडवर ठेवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT