राष्ट्रीय

Nobel Prize 2025 |डायबेटीज - आर्थरायटीसवर संधोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना यावर्षीचा मेडीकल क्षेत्रातील नोबेल पुरस्‍कार

नोबेल समितीने केली घोषणा : शरिराच्या इम्‍युन सिस्‍टीमबाबात केले मोलाचे संशोधन

Namdev Gharal

नवी दिल्‍ली : यंदाच्या मेडिकल क्षेत्रातील नोबेल पुरस्‍काराची घोषणा करण्यात आली असून मेरी ई ब्रँका, फ्रेड रैम्‍सडेल व शिमोन सकागुची यांना त्‍यांच्या संधोधनसाठी २०२५ चा नोबेल जाहीर झाला आहे.

फिजियालॉजी मेडिसीन मिळालेले या संशोधकांपैकी दोघे अमेरिकेतील आहेत तर एक संशोधक जपानचा आहे. मेरी ई. ब्रंकॉ या व फ्रेड राम्‍सडेल हे अमेरिकन वैज्ञानिक आहेत. तर शिमोन सकागुची हे जापानी वैज्ञानिक आहेत. ‘पेरिफेरल इम्‍युन टॉलरेंन्स’ (Peripheral immune tolerance) शरिरातील बाहेरील अंगामध्ये सुरक्षा प्रणालीची सहनशिलता यासंदर्भात केलेल्‍या संशोधनाबद्दल या तिघांना विभागून हा पुरस्‍कार दिला गेला आहे.

त्‍यांच्या या शोधामुळे शरिराची इम्‍युन सिस्‍टिम समजून घेण्यासाठी खूप उपयुक्‍त ठरली आहे. यामुळे रुमेटाईड आर्थराटिस, टाइप १ प्रकारचा डायबेटीस व ल्‍यूपस सारख्या रोगांसाठी सुलभरित्‍या उपचार करता येतील. तसेच प्रतिरक्षा प्रणालीतील “रेग्युलेटरी T-कोशिका (Regulatory T cells)” या प्रकारच्या कोशिकांचा शोध आणि त्यांचे कार्य समजून घेणे यामुळे, ऑटोइम्युन रोग (immune system च्या चुकीच्या प्रतिक्रिया) या आजारांवर उपचारांच्या दिशेने वाट उघडण्यास मदत होईल. असे नोबेल समितीने पुरस्‍काराची घोषणा करताना म्‍हटले आहे.

पुरस्‍काराची घोषणा 6 ऑक्टोबर 2025 रोजी स्‍टॉकहोममधील कारोलिंस्‍का इंस्‍टिट्यूटने केली आहे. या पुरस्काराची रक्कम 11 दशलक्ष स्वीडिश क्रोन (SEK) इतकी आहे ती विजेत्यांमध्ये विभागून दिली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT