नो गो... मेसेज आल्यानंतरही विमान का पुढं गेलं ? रोहित पवारांचा सवाल file photo
राष्ट्रीय

नो गो... मेसेज आल्यानंतरही विमान का पुढं गेलं ? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash : या देशात दोन 'पावरफुल' व्यक्ती...रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे केली मोठी मागणी.

पुढारी वृत्तसेवा

No Go... Why did the plane continue even after receiving the message? Rohit Pawar's question

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्देवी मत्‍यू झाला. त्‍यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेउन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

या पत्रकार परिषदेत त्‍यांनी जी व्हीएसआर कंपनीला मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे. यातील काही लोक सत्तेत आहेत. या प्रकरणात राजकीय किंवा औद्योगिक षडयंत्र आहे. डीजीसीए च्या मोठ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याचा आरोप करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच या प्रकरणाला न्याय देऊ शकतात असे त्‍यांनी म्हटले आहे.

मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान या पत्रकार परिषदेत त्‍यांनी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो राम मोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा. तसेच राहुल गांधी यांनी हे प्रकरण हाती घ्यावं अशी विनंती त्‍यांनी केली आहे.

विमानात होत एक्स्ट्रा इंधन

विमानात मोठ्या प्रमाणात इंधन होतं. त्याचबरोबर एक्स्ट्राचं इंधन देखील विमानात होते. फ्युल इम्बॅलन्सचा मेसेज आल्यानंतर देखील विमान पुढं नेले होते. नो गो मेसेज आल्यानंतर विमान का पुढं गेले? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

कॅप्टन अपूर्वा अग्रवाल आणि कॅप्टन लोकेश रामपाल यांचा का समावेश करण्यात आला आहे? यांना या विमानासंदर्भात काही माहिती आहे का? असा प्रश्न विचारत, ब्लॅक बॉक्स जळाला नाही यात मानवी हस्तक्षेप झाल्याच त्‍यांनी म्हटलं आहे. हे विमान ३५ कोटीला विकत घेतलं होतं तर या विमानाचा ५५ कोटी रूपयांचा विमा काढला होता.

VSR कंपनीच्या मालकांशी राम नायडू यांचे संबंध असल्याचा दावा रोहित पवार यांनी या अगोदरच केले होते. त्‍यावर टीडीपी किंवा मंत्री राममोहन नायडू यांचा व्हीएसआर कंपनीशी कोणताही संबंध नाही असं या अगोदर सांगण्यात आलं आहे. मात्र, आज रोहित पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचे आणि व्हीएसआर कंपनीचे कसे संबंध आहेत हे सांगत त्‍यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांच्या मागण्या…

1)व्हीएसआर कंपनीचे आणि टीडीपीचे आर्थिक संबंध आहेत. त्यामुळं राम मोहन नायडू यांचा राजीनामा व्हावा.

2) अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी… त्यासाठी एका समितीची नियुक्ती करावी..

3) माजी न्यायाधीश, लोकसभा लीडर ऑफ ऑपोजिशन, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदार, दादांच्या कुटुंबातील सदस्य, इतर पक्षांच्या सदस्यांसह समावेश असलेल्या समितीमार्फत पारदर्शक चौकशी व्हावी…

अजित पवार हे एनडीए चे घटक पक्ष होते. ते देखील मित्र होते.. आता हे पाहावं लागेल की मैत्री च्या बाजूने भाजप उभे राहते की राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करतात… की राजकारण आणि व्यापाराचा विचार करतात.

दरम्यान या विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर रस्त्यावरची लढाई लढायची का हे ठरवणार आहे. वेळ पडली तर रस्त्यावर येऊ असे रोहीत पवार यांनी स्पष्ट केलंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT