राष्ट्रीय

Nitish Kumar : संयुक्त जनता दलाची दिल्लीत २९ जूनला बैठक

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Nitish Kumar : केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २९ जून रोजी राजधानी दिल्लीत होणार आहे.

नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या बैठकीत बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. रालोआचा घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन उर्फ ललन सिंह केंद्रात मंत्री तर रामनाथ ठाकूर राज्यमंत्री आहेत. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांसह इतर नेते, बिहार सरकारमधील मंत्री आणि पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने उत्तम कामगिरी बजावली आहे. रालोआ सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील आपले वर्चस्व दाखविण्यासाठी संयुक्त जनता दलाने ही बैठक बोलाविली आहे. या बैठकीत बिहारसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केंद्रसरकारडे करून त्याबाबत ठराव मांडला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT