Nitish kumar
बिहार विधानसभेतील जेडीयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.  File Photo
राष्ट्रीय

'तुम्‍ही महिला आहात, तुम्‍हाला काही कळत नाही'

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहार विधानसभेतील जेडीयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. ते बिहार विधानसभेत बोलत होते. या विधानचा व्‍हिडिओ बिहारमधील विरोधी पक्ष राष्‍ट्रीय जनता दलाने (राजद) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्‍ट केला आहे.

नितीश कुमार नेमकं काय म्‍हणाले?

विधानसभेत नितीश कुमार जातनिहाय मोजणीबाबत स्पष्टीकरण देत होते. यादरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपलं म्‍हणणं मांडता आलं नाही. नितीश कुमार जोरजोरात बोलू लागले. बोलता बोलता काही बोलले त्यामुळे गदारोळ सुरु झाला. या वेळी नितीश कुमार दलित आणि महिला विरोधी असल्याचा आरोप आरजेडीने केला आहे. नितीश कुमार हे आमदार रेखा देवींना म्‍हणाले की, “अरे, तुम्‍हीएक महिला आहात, तुम्‍हाला काही कळत नाही. आज तू एक स्त्री म्हणून बोलत आहेस." मुख्यमंत्र्यांनी हे सांगताच सभागृहातील गदारोळ आणखीनच वाढला. याला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला.

नितीश कुमारांनी माफी मागावी : राजद

नितीश कुमारांच्‍या विधानावर आरजेडीच्या आमदार रेखा देवी यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, “एकीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार महिलांच्या विकासाबाबत बोलतात. तर दुसरीकडे अशी वादग्रस्‍त विधाने करतात.

राजदचे प्रवक्ते एजाज अहमद म्‍हणाले की, “रेखा देवी या महिला आणि दलित आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे विधान केवळ महिलाविरोधी नाही तर दलितविरोधीही आहे. रेखा देवी दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही. याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. विधानसभेत त्यांनी हे विधान केले असेल तर त्यांनी विधानसभेतच माफी मागावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

SCROLL FOR NEXT