नवी दिल्ली : मुंबईजवळच्या कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी ७७०.४९ कोटी मंजूर करण्यीत आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन ग़डकरी यांनी केली. नितीन ग़डकरी म्हणाले की, १५.५३ किमीचा एक महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प आहे.
पंचभुजा असलेला हा सिग्नलयुक्त रोटरी जंक्शन प्रकल्प मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग ४८, राष्ट्रीय महामार्ग ५४८, आणि सायन-पनवेल महामार्गाच्या छेदनबिंदूवर स्थित आहे. कळंबोली जंक्शन या प्रमुख महामार्गांवरून आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी जोडला जाईल, असेही ते म्हणाले. सोशल मीडियावर या संबंधी त्यांनी माहिती ्दिली.