Nitin Gadkari  Pudhari
राष्ट्रीय

दिल्लीत 3 दिवस राहिला तरी संसर्ग होईल; इथली विषारी हवा 10 वर्षे आयुष्य कमी करते...

Nitin Gadkari On Delhi Pollution: राजधानी दिल्लीविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला इशारा

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही वर्षात देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालला आहे. आता खुद्द केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्लीतील प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत गंभीर इशारा दिला आहे.

दिल्लीची हवा इतकी प्रदूषित आहे की, ती आपले आयुष्य 10 वर्षांनी कमी करते. येथे 3 दिवस राहिलात तरी संसर्ग होईल, असा दावा गडकरींनी केला आहे. (Nitin Gadkari On Delhi Pollution)

दिल्ली, मुंबई 'रेड झोन'मध्ये...

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील अत्यधिक प्रदूषण पातळीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, या शहरात थोडा वेळ देखील राहिल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिल्लीमध्ये तीन दिवस राहिलात तर तुम्हाला काहीतरी संसर्ग होईल.

वैद्यकीय संशोधनाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, राजधानी दिल्लीच्या विषारी हवेमुळे जीवनाची 10 वर्षे कमी होऊ शकतात. दिल्ली आणि मुंबई हे दोन्ही प्रदूषणाच्या "रेड झोन" मध्ये आहेत. पर्यावरणीय समस्यांवर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

22 लाख कोटींच्या इंधनाची आयात

गडकरी म्हणाले, "आपण सुमारे 22 लाख कोटी रुपये मूल्याच्या जीवाश्म इंधनांची आयात करतो. पेट्रोल आणि डिझेल प्रदूषणात मोठा भाग टाकतात. वाहतूक कोंडी सोडवायला हवी. वाहनांमध्ये वापरले जाणारे इंधन बदलण्याची आवश्यकता आहे.

मी पर्यायी इंधनांचे समर्थन करत आहे. 22 लाख कोटी रुपये बचत करून शेतकऱ्यांच्या खिशात 10-12 लाख कोटी रुपये टाकण्याचा मी इच्छुक आहे.

चीनचा लॉजिस्टिकचा खर्च 8 टक्के तर आपला 16 टक्के

गडकरी म्हणाले, भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दीष्टावर बोलताना त्यांनी सांगितले की, यशस्वी होण्यासाठी परिवहन, वीज, जल आणि दळणवळण क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आवश्यक आहे.

लॉजिस्टिकचा खर्च कमी करणे यालादेखील प्राधान्य द्यायला हवे. चीनचा लॉजिस्टिक खर्च 8 टक्के आहे, अमेरिकेचा आणि युरोपीय युनियनचा 12 टक्के आहे, पण आपला 14-16 टक्के आहे. आम्हाला ते एका अंकात आणायचं आहे.

पुढील वर्षी जानेवारीपर्यंत लॉजिस्टिक खर्च 16 टक्क्यांपासून 9 टक्क्यांवर आणला जाईल.

दिल्लीत मला अनेकवेळा संसर्ग

गडकरी म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीतील प्रदूषणामुळे राष्ट्रीय राजधानीला भेट देणे आव्हानात्मक वाटत होते. दिल्लीला भेट दिल्यानंतर मला अनेक वेळा संसर्ग होतो. प्रत्येक वेळेला दिल्लीला येताना असे वाटते की मी जावे की नाही. प्रदूषण इतकं भयंकर आहे.

आम्ही पर्यावरणाच्या समस्यांवर गंभीरपणे विचार केला नाही. पर्यावरण आणि नैतिकतेला अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांबाबत समप्राधान्य दिले पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते पायाभूत सुविधांच्या विकास एक महत्त्वाचा उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT