खासदार निशिकांत दुबे, माजी निवडणूक आयुक्‍त एस. वाय. कुरेशी (Image Source X)
राष्ट्रीय

निशिकांत दुबे यांचे टार्गेट आता एस. वाय. कुरेशी

Nishikant Dube | एस. वाय. कुरेशी माजी निवडणूक आयुक्‍त

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्वोच्च न्यायालयावर आक्षेपार्ह वक्‍तव्य करणारे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्‍यांच्या वक्‍तव्यावर भाजपाने सारवासारव केली असताना आता पुन्हा दुबे यांनी रविवारी माजी निवडणूक आयुक्‍त डाॅ. एस. वाय. कुरेशी यांच्यावर निशाणा साधला आहे. कुरेशी यांना दुबे यांनी निवडणूक आयुक्‍त ऐवजी ‘मुस्‍लिम आयुक्‍त’ असे संबोधले आहे.

सर्वोच्च न्यायालयामुळे धार्मिक युद्ध भडकते असे वक्‍तव्य करुन खळबळ माजवणरे खासदार दुबे यांच्या रडारवर माजी निवडूक आयुक्‍त आले आहेत. कुरेशी यांनी नुकतेच वक्‍फ सुधारण कायद्यावर मत व्यक्‍त केले होते. हा कायदा म्‍हणजे मुस्‍लिमांच्या जमीन हडपण्याचे सरकारची योजना असल्‍याचे म्‍हटले होते. १७ एप्रिल रोजी कुरेशी यांनी एक्‍सवर पोस्‍ट हे वक्‍तव्य केले होते. एस. वाय. कुरेशी हे भारताचे माजी निवणूक आयुक्‍त होते. ते ३० जुलै २०१० ते १० जून २०१२ या कालावधीत त्‍यांनी कामकाज पाहिले होते.

याचा दाखला घेत निशिकांत दुबे यांनी कुरेशी यांच्यावर प्रतिहल्‍ला केला आहे. तुम्‍ही निवडणूक आयुक्‍त नव्हता तर मुस्‍लिम आयुक्‍त होता. तुमच्या कार्यकाळातच झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बांग्‍लादेशींची खूसखोरी झाली होती. तसेच इस्‍लाम भारतात इसवी सन पूर्व ७१२ मध्ये भारतात आला होता. त्‍यापूर्वी या जमिनी कोणाच्या होत्‍या. हिंदू, जैन, की बौद्ध धर्मियांची असा सवालही उपस्‍थित केला आहे.

झारखंडमधील भाजपचे खासदार असलले निशिकांत दुबे आपल्‍या बेताल वक्‍तव्याने नेहमीच चर्चेत असतात. आता सर्वोच्च न्यायालयावरील टिपण्णीवरून गदारोळ माजला आहे. त्‍यांच्या वक्‍तव्यावर काँग्रेसचे नेते, तसेच समाजवादी पक्षाचे नेत अखिलेश यादव यांनीही खरपूस शब्‍दात टीका केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT