हिज्ब-उत-तहरीर संघटनेच्या ठिकाणांवर एनआयएचे छापे File Photo
राष्ट्रीय

हिज्ब-उत-तहरीर संघटनेच्या ठिकाणांवर एनआयएचे छापे

मोनिका क्षीरसागर

चेन्नई : वृत्तसंस्था

तामिळनाडूत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहावर ठिकाणांवर छापे घातले. हिज्ब-उत तहरीर या प्रतिबंधित संघटनेच्या चेन्नई, त्रिची, पुदुकोट्टई, तंजावर, इरोड आणि थिरुप्पुरसह अनेक शहरांतील ठिकाणांवर एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली.

एनआयएच्या पथकाने राज्य पोलिस दलासह हिज्ब उत-तहरीरशी संबंधित लोकांची ओळख पटवली व त्यांच्याविरोधात पुरावेही गोळा केले. एका वृत्तानुसार ५ शहरांतील १० ठिकाणी झडतीसत्र राबविण्यात आले. तंजावरला ५, इरोडला २ त्रिची, पुदुकोटाई, कांचीपुरमला प्रत्येकी एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला.

बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) अधिनियम, १९६७ च्या कलम १३(१) (ब) नुसार मदुराई येथील थिदीर नगर पोलिस ठाण्यात मुख्य संशयित मोहम्मद इकबाल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याने आपल्या बनावट फेसबुक अकाऊंटवर विशेष समुदायाची बदनामी चालविली होती. तो व त्याच्याशी संबंधित लोक युवकांना कट्टरवादी बनवत असत. भारताविरुद्ध जिहाद करणे आपले पवित्र कर्तव्य असल्याचे ते युवकांना सांगत आणि हिज्ब उत-तहरीरमध्ये भरती करण्याचे काम करत असत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT