संग्रहित छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये घुसखोरी प्रकरणी NIAची माेठी कारवाई

NIA raids Jammu and Kashmir : जम्‍मूमध्‍ये एकाचवेळी १२ ठिकाणी छापे

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. काश्मीरमध्ये १२ ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्था छापे टाकत आहे. (NIA raids Jammu and Kashmir)

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, २४ ऑक्टोबर रोजी, एनआयएने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरून लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित सक्रिय दहशतवाद्यांच्या भारतीय हद्दीत घुसखोरीबाबतच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. एनआयएने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणासंदर्भात असाच शोध घेतला होता. या काळात 'एनआयए'ने संशयितांच्या परिसरातून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT