हरियाणाच्या गुरुग्राममधील क्लब बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. (file photo)
राष्ट्रीय

Gurugram club bombing case | गुरुग्राम क्लब बॉम्बस्फोट प्रकरण : NIA चे गँगस्टर गोल्डी ब्रारसह ५ जणांवर आरोपपत्र

गुरुग्राम क्लब बॉम्बस्फोटाचा कट रचण्यात सर्व आरोपींचा हात

पुढारी वृत्तसेवा

Gurugram club bombing case

नवी दिल्ली : हरियाणाच्या गुरुग्राममधील क्लब बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात गँगस्टर गोल्डी ब्रार (Goldy Brar) याच्यासह सचिन तलियान, अंकित, भाविश आणि अमेरिकेतील रणदीप सिंग उर्फ रणदीप मलिक या आरोपींच्या नावाचा समावेश आहे. क्लब बॉम्बस्फोट प्रकरणाचा कट रचण्यात सर्व आरोपींचा हात असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शस्त्रास्त्र कायदा, स्फोटके पदार्थ कायदा आणि यूएपीएच्या विविध कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत गोल्डी ब्रार आणि रणदीप मलिक वगळता इतर सर्वांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हे सर्व आरोपी बब्बर खलिस्तानी इंटरनॅशनल (बीकेआय) या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. हरियाणा आणि शेजारच्या प्रदेशांमध्ये सांप्रदायिक तेढ पसरवण्यासाठी आणि शांतता बिघडवण्याच्या मोठ्या कटाचा भाग म्हणून गुरुग्रामच्या सेक्टर २९ मधील वेअरहाऊस क्लब आणि ह्यूमन क्लबला बॉम्बने लक्ष्य करण्याच्या कटात सर्व आरोपी सहभागी असल्याचे तपास यंत्रणेला आढळले आहे. बीकेआय दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी केलेला हा हल्ला गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी झाला होता.

दहशतवादी कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रचला

एनआयएच्या तपासात असे दिसून आले की, दहशतवादी कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रचला होता, असे तपास संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. एनआयएच्या तपासानुसार, गोल्डी ब्रार आणि इतर आरोपी पैसे उकळणे, दहशतवादी निधी उभारणे, स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा जमा करण्याच्या कटात सहभागी आहेत. यामुळे देशाची अखंडता, सुरक्षितता आणि सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. यामुळे सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी तपास संस्था एनआयएने या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT