पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील जागतिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित प्रकरणात आज (दि.१२ जुलै) राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर ISIS दहशतवादी कट प्रकरणातील २ व्यक्तींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्या X अकाऊंटवरून हे आरोपपत्र शेअर केले आहे. या आरोपत्रात 'एनआयए'ने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर ISIS दहशतवादी कट प्रकरणात दाखल आरोपपत्रात 1 लिबियास्थित ISIS दहशतवाद्याचा देखील समावेश असल्याचे एनआयएने म्हटले आहे.
मोहम्मद जोहेब खानया दहशतवाद्याला एनआयएने या वर्षी फेब्रुवारीमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर अटक केली होती. एनआयएने लिबियास्थित मोहम्मद खानसह आयएसआयएसच्या भारतविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देण्याच्या कटात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांने भारतातील संवेदनशील प्रतिष्ठानांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी असुरक्षित तरुणांची भरती करण्याचा कट रचला होता, असे देखील NIA ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.