राष्ट्रीय

नवा सोशल मीडिया कायदा लवकरच

मोहन कारंडे

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या युगात प्रायव्हसी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. अशा परिस्थितीत नवीन सोशल मीडिया कायद्याची गरज आहे. नवीन सोशल मीडिया कायदा २६ मे २०२१ रोजी भारतात लागू झाला. यामध्ये परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यावर बंदी घातली. फ्रान्समध्ये मात्र मुलांच्या परवानगीशिवाय पालक फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकणार नाहीत.

मुलांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेत, फ्रान्सने एक नवीन विधेयक मंजूर केले, ज्यामध्ये मुलांच्या परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यावर बंदी घातली. म्हणजेच पालकांनी त्यांच्या परवानगीशिवाय मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यास त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT