राष्ट्रीय

कोरोनामुक्त झाल्यानंतर लस कधी घ्यावी? नवीन नियम जारी!

Pudhari News

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या लोकांची लसीकरण आता तीन महिन्यांनंतर होईल. कोविड-१9 लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ज्ञ गटाने केलेली ही सूचना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी मान्य केली आहे.

अधिक वाचा : गडकरींकडून कालच्या सल्ल्यावर आज स्पष्टीकरण!

आत्तापर्यंत ६ महिन्यांनंतर लसीकरण करण्याची शिफारस केली जात होती. या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की कोरोना विषाणूची लागण झाल्यावर लसीकरण तीन महिन्यांकरिता पुढे ढकलले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, सूचनांमध्ये असे सांगितले गेले आहे की लसीकरणापूर्वी कोरोना सक्रमणाची चौकशी करण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचणीची गरज नाही.

अधिक वाचा : चक्रीवादळाचा तब्बल चार राज्यात हाहाकार, पण केंद्राकडून प्रथम गुजरातला १ हजार कोटींची मदत!

सूचनांनुसार, कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्याचे आढळल्यास, दुसरी लस त्याच्या उपचारानंतर तीन महिन्यांनंतर दिला पाहिजे. तज्ज्ञ गटाने स्तनपान देणाऱ्या  महिलांसाठी कोविड-१९ लसीकरणाची शिफारस देखील केली आहे. या गटाने सर्व गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना लसीकरणाची करण्याची शिफारस केली आहे.  दरम्यान हा मुद्दा केंद्राच्या विचाराधीन असला, तरी अद्याप निर्णय झालेला नाही. 

अधिक वाचा : राजभवनावर शेळ्या नेऊन राज्यपालांविरुद्ध आंदोलन 

SCROLL FOR NEXT