नवी दिल्ली : दिल्लीतील द्वारका येथील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी आग लागली होती. या अपार्टमेंटमध्ये नवव्या मजल्यावर असलेल्या वडील आणि दोन भावंडांनी (मुलगा-मुलगी) स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही त्यांना बाहेर न काढता आल्याने त्यांनी जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, द्वारका अपार्टमेंटमध्ये आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी उडी मारली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र या घटनेसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या खूप उशिरा आल्या आणि त्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकांचा आहे.