New date of NEET PG 2024 re-exam announced
NEET PG 2024 पुनर्परीक्षेची नवीन तारीख जाहीर File Photo
राष्ट्रीय

NEET PG 2024 पुनर्परीक्षेची नवीन तारीख जाहीर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परिक्षा मंडळाने (एनबीईएमएस) शुक्रवारी नीट-पीजी परिक्षेच्या नवीन तारखेची घोषणा केली. या घोषणेनुसार नीट-पीजी परिक्षा रविवार, ११ ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा २३ जून रोजी होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

नीट-यूजी परिक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणानंतर नीट-पीजी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय २२ जून रोजी घेण्यात आला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही परिक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर या नव्या तारखेची घोषणा करण्यात आली. या परिक्षेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनबीईएमएसच्या संकेतस्थळाला भेट द्यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

याआधी 23 जूनला होणार होती परीक्षा

यापूर्वी, नीट पदव्युत्तर परीक्षा, २०२४ (NEET PG 2024) सुरुवातीला 23 जून रोजी नियोजित होती. देशातील पेपर फुटीच्या प्रकरणांनंतर आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून ती पुढे ढकलली होती. त्यानंतर आज (दि.५ जुलै) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) नीट पदव्युत्तर परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

अधिक माहितीसाठी 'या' वेबसाईटवर क्लिक करा

यावर्षी ही परीक्षा रविवार 11 ऑगस्ट 2024 रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. उमेदवारांनी या परीक्षेच्या अधिक अद्यतने आणि माहितीसाठी https://natboard.edu.in/ या अधिकृत वेबसाइट भेट द्यावी, असेही वृत्तात म्हटले आहे.

NTA समितीच्या नवीन नेतृत्वाखाली 'हा' निर्णय

परीक्षेत होणारा विलंब आणि चाचणी प्रक्रियेतील इतर सुधारणा हे आता इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) च्या नवीन नेतृत्वाखाली अंमलात आणल्या जात असलेल्या व्यापक बदलांचा भाग आहेत.

माजी ISRO प्रमुख नीट-यूजी परीक्षा समितीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात देशभरातील रोष पाहायला मिळत आहे. यापाठोपाठ नेट परीक्षाही रद्द करण्‍याची नामुष्‍की सरकारवर ओढवली. यानंतर आता शिक्षण मंत्रालयाने देशातील स्‍पर्धात्‍मक परीक्षेतील सुधारणा करण्‍यासाठी एका समितीची स्‍थापना केली आहे. या समितीच्‍या प्रमुखपदी माजी इस्‍त्रो प्रमुख डॉ. के. राधाकृष्‍णन असतील, अशी घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे.

SCROLL FOR NEXT