Jo Bachay Hain Sang Samait Lo File Photo
राष्ट्रीय

Jo Bachay Hain Sang Samait Lo: 'जो बचे हैं संग समेट लो' या पाकिस्तानी वेब सीरिजवर भारतात बंदी? नेटफ्लिक्सला केंद्राचा इशारा

Netflix Pakistan Content Ban: पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या चित्रपट, वेब सीरिज आणि अन्य मनोरंजनात्मक कंटेंट भारतात प्रसारित करू नये, अशी भूमिका केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

मोहन कारंडे

Jo Bachay Hain Sang Samait Lo:

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या चित्रपट, वेब सीरिज आणि अन्य मनोरंजनात्मक कंटेंट भारतात प्रसारित करू नये, असा इशारा केंद्र सरकारने पुन्हा एकदा नेटफ्लिक्सला दिला आहे. पाकिस्तानची वेब सीरिज ‘जो बचा है संग समेट लो’ भारतात प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, मंत्रालयाने नेटफ्लिक्सला गेल्या वर्षी जून महिन्यात दिलेल्या आश्वासनाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यावेळी, या नेटफ्लिक्सने मंत्रालयाला कळवले होते की, पाकिस्तानातील कोणताही चित्रपट किंवा वेब सीरिज भारतातील त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जात नाही. मंत्रालयाने नेटफ्लिक्सला आपली तीच भूमिका कायम ठेवण्यास सांगितले आहे, जी त्यांनी यापूर्वी स्पष्ट केली होती.

नेमका वाद काय?

पाकिस्तानी वेब सीरिज ‘जो बचा है संग समेट लो’ भारतात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी मंत्रालयाकडे करण्यात आल्या होत्या. ही वेब सीरिज ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक संघटना आणि प्रतिनिधींनी नेटफ्लिक्सला ही सीरिज भारतात प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा निर्णय

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक तणावपूर्ण झाले होते. या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ८ मे २०२५ रोजी महत्त्वाचे निर्देश जारी केले होते.

या निर्देशांनुसार, भारतात कार्यरत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल मध्यस्थांना पाकिस्तानमध्ये तयार होणारा कंटेंट उपलब्ध करून देणे बंद करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये वेब सीरिज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि अन्य डिजिटल मनोरंजनाचा समावेश होता. विशेष म्हणजे, हा नियम सशुल्क सदस्यत्वासह मोफत उपलब्ध असलेल्या कंटेंटलाही लागू करण्यात आला होता.

नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन रद्द करण्याचे आवाहन

दरम्यान, काही संघटनांनी भारतीय प्रेक्षकांना असे आवाहन केले आहे की, जर नेटफ्लिक्सने ही सीरिज प्रदर्शित केली, तर त्यांनी आपली नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रद्द करावे. त्यांनी सरकारकडे अशी मागणीही केली आहे की, पाकिस्तानी चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, कलाकार आणि इतर मनोरंजन सामग्री भारतीय व्यासपीठांवर दिसण्यापासून रोखण्यासाठी एक कायमस्वरूपी कायदेशीर तरतूद लागू करण्यात यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT