NEET-UG पेपरफुटी प्रकरणातील कथित सूत्रधार राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) आज ( दि. ११) बिहारमधील नालंदा येथे अटक केली. File Photo
राष्ट्रीय

NEET-UG पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

NEET-UG पेपरफुटी प्रकरणातील कथित सूत्रधार राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) आज ( दि. ११) बिहारमधील नालंदा येथे अटक केली. त्‍याला पाटणा येथील सीबीआय न्यायालयाने त्‍याला 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

राकेश रंजन याच्‍या माग काढण्‍यासाठी पाटणा आणि कोलकाता येथे चार विविध ठिकाणी सीबीआयने शोध घेतला. राकेशचा आयपी ॲड्रेस आणि ईमेल ॲड्रेसद्वारे शोध घेण्यासाठी सीबीआयने प्रगत तंत्रांचा वापर केला. यावेळी रॉकी बाबत माहिती मिळाली. नालंदा येथे त्‍याला अटक करण्‍यात आली असून, अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आल्‍याची माहिती सीबीआय अधिकार्‍यांनी दिली.

राकेश रंजन उर्फ ​​रॉकी याच्‍या मालकीचे झारखंडची राजधानी रांचीमध्ये हॉटेल आहे रॉकी यानेच NEET-UG ची प्रश्नपत्रिका फुटल्‍यानंतर ती एका उमेदवाराकडे पाठवल्‍याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या सीबीआयने एका उमेदवारासह आणखी दोन जणांना पाटणा येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी मुख्य आरोपीची अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत ११ जणांना अटक, सहा जणांवर गुन्‍हे दाखल

सीबीआयने अटक केलेल्‍या उमेदवार सनी हा मुळचा नालंदा येथील आहे. सीबीआयने आतापर्यंत बिहारमध्‍ये NEET-UG पेपरफुटी प्रकरणी नऊ जणांना तर लातूर आणि गोध्रा येथे फेरफार प्रकरणी प्रत्येकी एकाला अटक केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सहा जणांवर गुन्‍हे दाखल केले आहेत. NEET-UG पेपर लीक प्रकरणी बिहारमधून सीबीआयने अटक केलला रॉकी हा नववा संशयित आरोपी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT