NEET Paper Leak Case pudhari photo
राष्ट्रीय

NEET-UG 2024 Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखियाला CBI कडून क्लीनचिट

Anirudha Sankpal

NEET-UG 2024 Paper Leak: नीट यूजी २०२४ प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला क्लीन चीट मिळाली आहे. संजीव मुखियाचा प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी सहभाग असल्याचा कोणताही पुरावा सीबीआय तपासात आढळून आलेला नाही. या प्रकरणी बिहार पोलिसांनी प्राथमिक संशयावरून संजीव मुखियाला आरोपी केले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते.

सीबीआयने तपासादरम्यान, प्रश्नपत्रिका चोरी आणि वितरणातील सर्व आरोपी तसेच चोरीच्या पेपरचा फायदा घेणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवली. या प्रकरणात CBI ने 45 आरोपींविरोधात पाटणा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, संजीव मुखियाविरोधात NEET-UG 2024 पेपर चोरी किंवा वितरणात सहभागाचा पुरावा न मिळाल्याने CBI ने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही.

संजीव मुखियाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती; मात्र नंतर त्याला जामीन मिळाला. सध्या तो बिहार पोलिसांकडून तपास सुरू असलेल्या इतर प्रकरणांमध्ये आरोपी आहे. NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणाचा CBI तपास पूर्ण असून, या प्रकरणातील संपूर्ण कट आणि त्यात सहभागी व्यक्तींची ओळख पटल्याचे CBIचे स्पष्टीकरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT