Fifty Percent Student's Absent in NEET-PG Reexam 2024
नीट परीक्षा File Photo
राष्ट्रीय

'नीट' फेरपरीक्षेला ५० टक्‍के विद्यार्थ्यांची दांडी!

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : NEET च्या निकालात वाढीव गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांसाठी आज २३ जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने स्‍पष्‍ट केले होते. आज ही परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत झाली. मात्र या परीक्षेला ५० टक्‍के उमेदवार गैरहजार राहिले.

750 उमेदवारांनी परीक्षा देणे टाळले

माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने रविवारी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सहा केंद्रांवर 1,563 उमेदवारांसाठी NEET-UG परीक्षेची पुनर्परीक्षा घेतली. चाचणी पॅनेलनुसार, 1,563 उमेदवारांपैकी 813 उमेदवार आज फेरपरीक्षेला उपस्‍थित होते. 750 उमेदवारांनी परीक्षा देणे टाळले.

मेघालय, हरियाणा, छत्तीसगड, गुजरात आणि चंदीगड येथील सहा केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे वेळेचे नुकसान झाल्याची भरपाई झालेल्या विद्यार्थ्यांना NTA ने ग्रेस गुण मागे घेतल्यानंतर ही परीक्षा घेण्यात आली होती. दोन विद्यार्थी चंदीगडमध्ये त्यांची NEET-UG रीटेस्ट घेणार होते, परंतु त्यापैकी कोणीही परीक्षा केंद्रावर आले नाहीत. तर छत्तीसगडमध्ये परीक्षा दोन केंद्रांवर होणार होती यामध्ये 602 उमेदवार पुन्हा चाचणीसाठी पात्र होते. आज परीक्षेसाठी २९१ उमेदवार हजर होते. हरियाणातील दोन परीक्षा केंद्रांवर ४९४ उमेदवारांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी 287 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मेघालयात आज 464 पैकी 234 पात्र उमेदवारांनी परीक्षा दिली.गुजरातमध्ये एका उमेदवारासाठी पुन्हा चाचणी घेण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) संबंधित उमेदवारांना दिलेले नुकसानभरपाईचे गुण रद्‍द केले हाेते. तसेच या उमेदवारांची 23 जून रोजी फेरपरीक्षा होईल असे स्‍पष्‍ट केले होते. तसेच या फेरपरीक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी जाहीर केला जाईल, असेही NTAने स्‍पष्‍ट केले होते.

SCROLL FOR NEXT