NEET Paper Leak Case pudhari photo
राष्ट्रीय

NEET Paper Leak-'नीट'चे प्रश्न फोडण्यासाठी 'फिफा वर्ल्डकप' नावाचा वापर!

NEET Paper Leak Using ‘FIFA World Cup’ WhatsApp Group- विशेष व्हॉट्सअॅप ग्रुपची निर्मिती; रोकड अन् घड्याळही बक्षीस म्हणून घेतले; सीबीआयच्या आरोपपत्रात कुलकर्णीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात गदारोळ निर्माण करणाऱ्या 'नीट-यूजी २०२६' पेपरफुटीच्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा (एनटीए) रसायनशास्त्र तज्ज्ञ पी. व्ही. कुलकर्णी यानेच पेपरफुटीत सर्वात मोठी भूमिका पार पाडल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

पेपरफुटीची तयारी सहा महिने आधी ऑक्टोबर २०२५ पासूनच सुरू होती. विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविण्यासाठी 'स्पेशल क्लास', 'फिफा वर्ल्डकप' अशा विशेष नावांचे खास व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात आले होते. या प्रश्नांच्या बदल्यात रोख रकमेसोबतच घड्याळही भेट म्हणून घेण्यात आले, असे उल्लेख सीबीआयने आरोपपत्रात केल्याची माहिती पुढे आली आहे.

सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे की, 'एनटीए'चा केमिस्ट्री एक्स्पर्ट पी. व्ही. कुलकर्णी याची पेपरफुटीत मोठी भूमिका होती. गोपनीयतेचा भंग करून त्याने २५ ते २७ एप्रिलदरम्यान पुण्यात ९ व लातुरात तीन विद्यार्थ्यांचे स्पेशल क्लास घेतले. याच विद्यार्थ्यांपर्यंत केमिस्ट्रीचा लीक पेपर पोहोचवला गेला. सीबीआयने तपास करताना मायगेट अॅपचे एंट्री रेकॉर्ड व मोबाइल सीडीआरचा मेळ घातला. या दोन्हीवरून विद्यार्थ्यांचे कुलकर्णीच्या घरी ये-जा व स्पेशल क्लासमधील सहभागाला पुष्टी मिळाली.

विद्यार्थ्यांच्या लिखित नोट्सही लीक प्रश्नपत्रिकेशी जुळल्या. या नोट्स कुलकर्णीन दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या होत्या. कुलकर्णीच्या मोबाइलमधून 'नीट-यूजी २०२६' च्या पेपरशी तंतोतंत जुळणारी केमिस्ट्री प्रश्नपत्रिका व आन्सर स्लिपचे ९ फोटो मिळाले. मोबाइलमध्ये उमेदवार, त्यांचे पालक आणि इतर आरोपींशी संभाषणाचे पुरावेही मिळाले. परीक्षेनंतर एका उमेदवाराच्या आईने खूश होऊन कुलकर्णीला घड्याळ भेट देणार असल्याचेही म्हटले होते, असा दावा यंत्रणेने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT