neet paper leak cbi arrests two person from bihar and jharkhand  File Photo
राष्ट्रीय

NEET Paper Leak Case : सीबीआयला मोठे यश! बिहार, झारखंड येथून 2 जणांना अटक

नॅशनल टेस्ट एजेंसी (NTA) द्वारे पेपर पाठवले जात असताना केली चोरी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट यूजी पेपर (NEET UG Paper) लीक प्रकरणात सीबीआयने (CBI) दोन जणांना अटक केली आहे. खरंतर, अटक करण्यात आलेल्या दोघांवर नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका चोरी करण्यासह व्हायरल केल्याचा आरोप आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओखळ बिहारची राजधानी पटना येथील पंकज कुमार आणि झारखंडमधील हजारीबाग येथील राजू सिंह अशी झाली आहे. (NEET Paper Leak Case)

पंकज कुमारने केली प्रश्नपत्रिकांची चोरी

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंकज कुमार उर्फ आदित्यने एका पेटीच्या माध्यमातून पेपर चोरी केले होते. नीट परीक्षेचे पेपर ज्या पेटीतून पाठवले जात होते, त्यामधून पंकजने पेपर काढले होते. आरोपीने पेपर स्टील पेटीमधून चोरल्यानंतर ते लीक करण्यासाठी दुसरा आरोपी राजूने पंकजची मदत घेतली. (NEET Paper Leak Case)

पंकजने पेपर लीकसाठी कोणाची मदत घेतली?

हैराण करणारी गोष्ट अशी की, पंकजने पेपर अशावेळी चोरले जेव्हा ते नॅशनल टेस्ट एजेंसी (NTA) द्वारे पेपर पाठवले जात होते. यादरम्यान, दुसरा आरोपी राजू कुमारही पंकजची मदत करत होता. पेपर चोरी केल्यानंतर ते ज्या ठिकाणी पोहोचवायचे होते त्या सर्व ठिकाणी ते राजूने पोहोचवले.

राजू हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी

पंकज कुमारने जमशेदपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पंकज बोकारो येथे राहणारा असून सीबीआयने त्याला पटना येथून ताब्यात घेतले आहेय. याशिवाय राजू सिंहला हजारीबाग येथून अटक केली आहे.

पेपर लीक प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक

नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीआयीने आधीच 13 जणांना तब्यात घेतले होते. आता पंकज आणि राजूलाही अटक केली आहे. अशाप्रकारे नीट यूजी प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक झाली आहे. शुक्रवारी पटना हायकोर्टाने सर्व 13 आरोपींची रिमांड मिळाल्यानंतर सीबीआय मंगळवारी बेऊर तुरुंगात पोहोचली. तुरुंगातील काही आरोपींची चौकशी केल्यानंतर टीम सर्वांना घेऊन पटना येथील कार्यलयात पोहोचली. येथे टीमच्या सदस्यांनी सर्व आरोपींची वन टू वन चौकशी केली.

नीट यूजीची 5 मे रोजी परीक्षा

नीट यूजी-2024 परीक्षेचे आयोजन 5 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी 23.33 लाख विद्यार्थी देशातील 571 शहरातील 4750 केंद्रावर परीक्षेसाठी आले होते. यामध्ये 14 परदेशातील शहरांचाही समावेश होता. परीक्षेचा निकाल 4 जूनला जारी करण्यात आले. पण मोठ्या संख्येने टॉपर्स समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याच्या बातमीने जोर पकडला होता. यानंतर घटनेचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT