NEET पेपर लीक प्रकरण काही राज्यापुरते मर्यादित असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. File Photo
राष्ट्रीय

NEET-UG 2024 | मोठी बातमी ! NEET पेपरफुटी काही राज्यांपुरती मर्यादित; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट युजीसी पेपरफुटी प्रकरणात आज (दि.२ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने म्हत्त्वाचा निकाल दिला. NEET-UG 2024 च्या परीक्षेत कोणतेही पद्धतशीरपणे उल्लंघन झाले नाही. पेपरफुटी प्रकरण हे केवळ पाटणा (बिहार) आणि हजारीबाग (झारखंड) पुरते मर्यादित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पेपरफुटी बाबत कोणताही पद्धतशीर प्लॅन नाही; सर्वोच्च न्यायालय

सुप्रीम कोर्टाने NEET UG प्रकरणांमध्ये आपला निकाल दिला आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, NEET पेपर लीक केवळ हजारीबाग आणि पाटणा शहरापुरते मर्यादित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एखाद्याच्या तक्रारीचे निवारण होत नसेल तर ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. पेपरफुटी प्रकरण यामध्ये कोणतेही पद्धतशीर प्लॅन नसल्याचा आमचा निष्कर्ष आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट क

पेपरफुटी रोखण्याची जबाबदारी NTA आणि सरकारचीही

सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की, नीट पेपरफुटी प्रकरणात पद्धतशीरपणे बिघाड नाही. पेपरफुटीचा प्रभाव हा हजारीबाग आणि पाटणापुरता मर्यादित आहे. आम्ही संरचनात्मक कमतरतांकडे लक्ष दिले आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची ओळख सुनिश्चित करणे आणि पेपर लीक रोखण्यासाठी स्टोरेजसाठी एसओपी तयार करणे ही सरकार आणि एनटीएची जबाबदारी आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

'NTA'ने भविष्यात निष्काळजीपणा टाळावा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कोणाच्याही तक्रार किंवा शंकांचे निवारण झाले नाही तर ते उच्च न्यायालयात दाद मागण्यास जाऊ शकतात. पेपरफुटी पद्धतशीर नसल्याचा आमचा निष्कर्ष आहे. कोर्टा पुढे म्हटले आहे की, पेपरफुटीची घटना मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. NTA ने भविष्यात काळजी घ्यावी. अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळली पाहिजे. NEET ची पुनर्परीक्षा घेण्याची मागणी आम्ही फेटाळत आहोत, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT