NEET Paper Leak Fast Track Courts Pudhari
राष्ट्रीय

NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरण: फास्ट-ट्रॅक कोर्टात सीबीआयचे वकील हजर न राहिल्याने पहिली सुनावणी पुढे ढकलली! 

पुढील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी,

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या फास्ट-ट्रॅक न्यायालयात सोमवारी पहिली सुनावणी होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. कारण सुनावणीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) च्या वतीने कोणीही उपस्थित राहिले नाही.

विशेष न्यायाधीश अनु ग्रोव्हर बालीगा यांच्यासमोर दिनेश बिवाल आणि विकास बिवाल या दोन आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी होणार होती. "जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत सीबीआयकडून कोणीही उपस्थित राहिले नाही, असे न्यायाधीशांनी नमूद केले.

दरम्यान, आरोपीच्या वकिलाने सादर केलेल्या युक्तिवादाची न्यायाधीशांनी नोंद घेतली. आरोपीला रोहिणी जिल्हा न्यायालयात एका प्रकरणावर युक्तिवाद करायचा असल्याने आणि तो आता अधिक काळ थांबू शकत नसल्याने, हे प्रकरण ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात यावे, असे आरोपीच्या वकिलाने म्हटले. हे प्रकरण ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलत, न्यायाधीशांनी सरकारी वकील नियुक्त करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या फौजदारी प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायाधीशांनी शनिवारी फास्ट-ट्रॅक न्यायालयाचा कार्यभार स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT