NEET Question Paper Leak  
राष्ट्रीय

NEET Paper leak | नीट पेपरफुटी प्रकरणी १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित, आज न्यायालयात हजर करणार!

सीबीआयकडून २० हजार पानांचे आरोपपत्र दाखल, राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व आरोपींना २१ नोव्हेंबरला न्यायालयात वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २५ नोव्हेंबरपासून दररोज सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.  

या बहुचर्चित प्रकरणाचा खटला लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशाने न्यायालयाने दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात न्यायालयात तब्बल २० हजार पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने जुलै महिन्यात पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्याची दखल न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी घेतली होती. आता १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या नियमित सुनावणीकडे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याच्या सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे.

हे आहेत 14 आरोपी

1. यश यादव 

2. मंगीलाल बिवाल 

3. दिनेश बिवाल 

4. विकास बिवाल 

5. शुभम खैरनार 

6. धनंजय लोखंडे 

7. प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी 

8. तेजस हर्षद कुमार 

9. डॉ. मनोज शिरुरे 

10. शिवराज रघुनाथ मोटेगावकर 

11. मनीषा वाघमारे 

12. मनीषा मांढरे 

13. मनीषा संजय हवालदार 

14. शेषराव बजरंग सूर्यवंशी 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT