NEET paper leak case | नीट पेपरफुटीप्रकरणी दोघांना अटक; भाजप पदाधिकार्‍यासह भावाला जयपूरमधून अटक pudhari photo
राष्ट्रीय

NEET paper leak case | नीट पेपरफुटीप्रकरणी दोघांना अटक; भाजप पदाधिकार्‍यासह भावाला जयपूरमधून अटक

पुढारी वृत्तसेवा

जयपूर; वृत्तसंस्था : नीट-यूजी 2026 पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने जयपूर जिल्ह्यातील जामवा रामगढ शहरातून दोघा भावांना अटक केली. दिनेश बिवाल आणि मंगिलाल बिवाल अशी त्यांची नावे आहेत. दिनेश हा भाजपचा पदाधिकारी आहे.

याच प्रकरणात राहुरीतून धनंजय निवृत्ती लोखंडे (वय 26) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो माहेगाव-महाडूक सेंटर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. तर, पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातील सुखसागरनगर येथून मनीषा वाघमारे या ब्युटीपार्लर चालवणार्‍या महिलेला आणि मांजरी परिसरातून इंजिनिअरिंग करत असलेल्या शेषराव सोळंकी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.

राजस्थान विशेष कृती गटा (एसओजी) च्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, दिनेश बिवाल आणि त्याचा भाऊ मंगिलाल बिवाल यांना हरियाणातील एका व्यक्तीकडून नीट-2026 परीक्षेचे 120 प्रश्न असलेला गेस पेपर मिळाला होता. त्यांनी तो 15 लाख रुपयांना विकत घेतला आणि नंतर सीकरमधील अनेक विद्यार्थ्यांना विकला. आम्ही त्याला सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सीबीआयने बुधवारी सकाळी त्यांना अटक करून दिल्लीला नेले. दिनेशच्या मुलासह त्याच्या कुटुंबातील पाचजणांनी नीट परीक्षा ‘क्रॅक’ केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे संशय बळावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT