राष्ट्रीय

NEET Exam Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला ५ दिवसांची CBI कोठडी

पुढारी वृत्तसेवा

NEET Paper Leak Case Accused Shubham Khairnar Sent to 5 Day CBI Custody

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी शुभम खैरनारला न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने न्यायालयाकडे केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली आणि पुढील तपासासाठी खैरनारला तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

सीबीआयकडून न्यायालयात केलेल्या मांडणीनुसार, नीट पेपरफुटी प्रकरणातील इतर सहआरोपींचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. तसेच आरोपीकडील डिजिटल उपकरणे, मोबाईल डेटा, संभाषणांचे रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करून त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तसेच नीट २०२६ परीक्षेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडणे, पैशांचा प्रवाह तपासणे आणि संपूर्ण गुन्हेगारी कटाचा पर्दाफाश करणे महत्त्वाचे आहे.

यासाठी शुभम खैरनारला नाशिकसह महाराष्ट्रातील आणि देशातील अन्य संबंधित ठिकाणी नेऊन तपास करणे गरजेचे असल्याचेही सीबीआयने नमूद केले. तसेच, नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी पेपरफुटी झाली, प्रश्नपत्रिका कोणापर्यंत पोहोचवण्यात आल्या आणि शुभम खैरनारने आणखी कोणाला प्रश्नपत्रिका पुरवल्या याचाही तपास करायचा आहे. या सर्व कारणांमुळे न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी यश यादव, मांगीलाल बिवाल, विशाल बिवाल आणि धनंजय लोखंडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून देशभरातील विविध ठिकाणी तपास आणि चौकशी सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT