राष्ट्रीय

NEET 2024 : आक्रमक विद्यार्थ्यांमुळे आंदोलनाला धार

दिनेश चोरगे

[author title="प्रथमेश तेलंग" image="http://"][/author]

नवी दिल्ली :  वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि 1,563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) प्रचंड वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. नीट परीक्षेच्या गोंधळावरून विद्यार्थी व पालकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 'एसएफआय' संघटनेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयासमोर आंदोलन केले. नीट परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना जाब विचारला. अभाविपने एनटीएच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. नीट पेपरफुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी अभाविपच्या राष्ट्रीय सचिव शिवांगी खरवाल यांनी केली आहे. एनएसयूआयने 13 जून रोजी जंतरमंतरवर मोठे आंदोलन करून संपूर्ण परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूर, लखनौ, वाराणसीसह इतर ठिकाणीही आंदोलनाचा भडका उडाला आहे. नीट परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटसमोर विद्यार्थ्यांनी 11 जूनला आंदोलन करून नीट पेपरफुटीच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. झारखंडमधील रांची, बिहारच्या पाटणासह पश्चिम बंगालच्या कोलकातामध्येही विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय लोकशाही विद्यार्थी संघटनेने (एआयडीएसओ) कोलकाता येथील उच्च शिक्षण मुख्यालयाजवळ 13 जून रोजी आंदोलन केले आहे. हरियाणाच्या सोनीपत, राजस्थानच्या जयपूर, अजमेरमध्येही विद्यार्थी, पालक रस्त्यावर उतरले आहेत.

मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात

नीट परीक्षा 2024 च्या निकालात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. हा आकडा दरवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. 1,563 विद्यार्थ्यांना एनटीएने अकारण ग्रेस गुण दिले आहेत. काही परीक्षा केंद्रांवर पेपरफुटी झाल्याचा आरोप आहे.

SCROLL FOR NEXT