महाराष्ट्रातील यूपीएससी गुणवंतांचा दिल्लीत सत्कार  Pudhari Photo
राष्ट्रीय

विकसित भारतासाठी भ्रष्टाचार मुक्त अधिकाऱ्यांची गरज : सदानंद दाते

पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेतील महाराष्ट्राच्या गुणवंतांचा सत्कार आणि परीक्षार्थींना मार्गदर्शन कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला. या कार्यक्रमांमध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या २६ मराठी गुणवंताचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी क्रीडा मंत्रालयाचे सचिव सुजाता चतुर्वेदी आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

भारत देश विकसित होण्यासाठी स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त अधिकाऱ्यांची गरज

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांनी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी परीक्षार्थींच्या प्रश्नांची उत्तरे निवड झालेल्या गुणवंतानी दिले. दुसऱ्या सत्रात बोलतना राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते म्हणाले की, भारत देश विकसित होण्यासाठी स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त अधिकाऱ्यांची गरज आहे. यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अधिकारी झाल्यावर जात प्रांत धर्म हे सर्व भेद सोडून काम केले पाहिजे. सुजाता चतुर्वेदी यांनीही विद्यार्थ्यांना आणि नव्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याच सत्रात सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन पुढचे पाऊल या संस्थेतर्फे करण्यात आले होते. दिल्लीमध्ये यूपीएससी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुशील गायकवाड, रेखा रायकर, आनंद पाटील या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. हे कार्यक्रमाचे सहावे वर्ष होते.

या मराठी यूपीएससी गुणवंतांचा सत्कार

हिमांशू टेंभेकर, आशिष पाटील, शुभम पवार, गौरी देवरे, प्रितेश बाविस्कर, जान्हवी शेखर, कनिष्क जामकर, शुभम बेहरे, डॉ. केतन इंगोले, सुरज निकम, वृषाली कांबळे, मृगज यादव, सुरेश बोरकर, श्रीकृष्ण सुशिर, सागर भामरे, अभिषेक ओझर्डे, मयूर गिरासे, राजश्री देशमुख, संकेत आढाव, विनय पाटील, आकाश कदम, संस्कार गुप्ता, मानसिंग राठोड, व्ही. भार्गव , आशिष घोगरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT