नवी दिल्ली: NCERT Books | राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या (NCERT) काही वर्गांच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती पुढील वर्षीपासून कमी केल्या जातील, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी (दि.१७) जाहीर केले. प्रधान पुढे म्हणाले की, कौन्सिल सध्या दरवर्षी पाच कोटी पाठ्यपुस्तके छापली जातात. परंतु, पुढील वर्षांपासून ही क्षमता 15 कोटींपर्यंत वाढवण्याचे काम सुरू असल्याने NCERT च्या किंमतीत घट होणार असल्याचेही ते म्हणाले. 2026-27 या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 9 वी ते 12वीच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.
मंत्री प्रधान माध्यमांशी बोलताना म्हणाले, “पुढील शैक्षणिक वर्षात NCERT 15 कोटी दर्जेदार आणि परवडणारी पुस्तके प्रकाशित करणार आहे. सध्या ती सुमारे पाच कोटी पाठ्यपुस्तके प्रकाशित करते. पाठ्यपुस्तकांची मागणी आणि पुरवठा या मुद्द्यावर यापूर्वीही चिंता व्यक्त केल्या जात होत्या पण आता त्या दूर केल्या जातील.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “पुस्तकांची संख्या जास्त असल्याने काही वर्गांच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती कमी केल्या जातील. पालकांवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये यासाठी कोणत्याही वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ केली जाणार नाही. प्रक्रिया चालू आहे आणि इयत्ता 9-12 ची पाठ्यपुस्तके 2026-27 शैक्षणिक सत्रापर्यंत तयार होतील,".
पूर्वी पाठ्यपुस्तकांबाबत मागणी आणि पुरवठा समस्यांबाबत चिंता व्यक्त केली जात होती, मात्र आता यावर उपाय केला जाईल. पुस्तकांच्या छपाईचे प्रमाण अधिक असणार असल्याने काही वर्गांसाठी पाठ्यपुस्तकांच्या किमती कमी केल्या जातील. मात्र, पालकांवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये, यासाठी कोणत्याही वर्गाच्या किमतीत वाढ केली जाणार नाही, असे देखील प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.