छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोट घडवून आणला. representational image
राष्ट्रीय

मोठी बातमी : छत्तीसगडमध्‍ये नक्षली हल्‍ल्‍यात दोन जवान शहीद

सुकमात IED स्फोटाने 'सीआरपीएफ'चा ट्रक उडवला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी केलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे.

सुकमा जिल्ह्यातील सिल्गर आणि टेकुलागुडेम गावांदरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी पेरली होती. सीआरपीएफच्‍या कोब्रा 201 बटालियनचे कर्मचारी, सिल्गरहून तेकुलागुडेम शिबिरांकडे जात असताना IED स्फोटामुळे एक ट्रक उडाला. या हल्‍ल्‍यात दोन जवान शहीद झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT