राष्ट्रीय

National Herald Case : काँग्रेसच्या ‘ईडी’ समोरील शक्तीप्रदर्शनावर भाजपची जोरदार टीका

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजेरी लावली. मात्र त्याचवेळी पक्षाच्या नेत्या – कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयासमोर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या मुद्यावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. (National Herald Case)

राहुल गांधी यांची 'ईडी' मध्ये चौकशी सुरु असताना नेत्या-कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढला जाणे आणि सत्याग्रह करणे म्हणजे तपास संस्थांवर उघडपणे दबाव आणण्याची रणनीती असल्याचे भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गांधी कुटुंबियाला आपली दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती वाचवायची आहे आणि त्यासाठीच भ्रष्टाचाराचे समर्थन करत शक्तीप्रदर्शन केले जात असल्याचे ईराणी यांनी नमूद केले. (National Herald Case)

गांधी कुटुंबियांचे एका वर्तमानपत्रात मोठे स्वारस्य आहे. कारण ही मीडीया कंपनी आता अचल संपत्तीच्या व्यवहारात कार्यरत आहे. केवळ सोनिया आणि राहुल गांधीच नव्हे तर सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा व त्यांचे नातलग या संपत्तीने मोहित झालेले आहेत. तथापि कोणीही कायद्याच्या वर नाही, याची जाणीव गांधी कुटुंबियानी व संबंधितांनी ठेवणे गरजेचे आहे, अशी टिप्पणी ईराणी यांनी केली. दरम्यान भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यासंदर्भात म्हणाले की, काँग्रेस आज जे काही करीत आहे, ते भ्रष्टाचाराचे राजरोस समर्थन आहे. राहुल यांचा घोटाळा लपविण्याचा प्रयत्न सफल होणार नाही. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात तपास संस्था निश्चितपणे निष्पक्षपणे काम करतील, असा आमचा विश्वास आहे. (National Herald Case)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT