राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्‍या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या शासनाच्या प्रधान सचिवांनी एका परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना केंद्रशासित प्रदेशातील सकाळची प्रार्थनाही गणवेशात ठेवावी, असेही निर्देश दिले आहेत.

जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण विभागाने बुधवारी ( दि.१३) जारी केलेल्‍या परिपत्रकात म्हटले आहे की, " असे आढळून आले आहे की, जम्‍मू-काश्‍मीरमधील शाळांमध्‍ये एकसमान नियम नाहीत. काही शाळा पारंपरिक नियमांचे पालन करत नाहीत. सर्व शाळांच्‍या कामकाजाची सुरुवात ही राष्ट्रगीताने व्‍हावी. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची आणि शिस्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा एक अमूल्य असा उपक्रम आहे."

शाळांमध्‍ये सकाळच्‍या सत्रात राष्‍ट्रगीताबरोबरच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि अंमली पदार्थांच्या विरोधात जगजागृती करण्‍यात यावी, असेही शालेय शिक्षण विभागाने म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT