Vineet Joshi 
राष्ट्रीय

Education Secretory Transfer: केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना हटवले

केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची उचलबांगडी केली. त्याठिकाणी आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

Education Secretory Transfer

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्रालयावर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिव विनीत जोशी यांची उचलबांगडी केली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) 1994 बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

गंगवार हे यापूर्वी मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून वायू व जलप्रदूषण नियंत्रण तसेच घातक रसायन व्यवस्थापनाशी संबंधित विभागांची जबाबदारी सांभाळली होती.

राजस्थान सरकारमध्येही त्यांनी प्रधान सचिव म्हणून विविध महत्त्वाच्या धोरणात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, 2010 ते 2014 या कालावधीत राष्ट्रीय सौर मिशनच्या प्रारंभिक धोरणनिर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थी आंदोलने सुरू असताना शिक्षण मंत्रालयातील हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT