पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तीं यांनी मध्यतंरी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० तास काम केले पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यावरुन बरीच चर्चा झाली होती. अनेक नेटकऱ्यांनी यावर टीका केली होती. मूर्तीं यांच्यानंतर ‘एल ॲन्ड टी’चे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांनीही रविवारीही कर्मचाऱ्यांनी काम केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. या दोघांच्या वक्तव्यामुळे त्यावेळी अनेक माध्यमांमध्ये चर्चेच्या फेऱ्या रंगल्या होत्या.
मिंटच्या वृत्तानुसार, आता पुन्हा हा मुद्दा चर्चेला येण्याचे कारण म्हणजे नारायण मूर्ती आणि त्यांचे जावई इंग्लडचे माजी पंतप्रधान ॠषी सुनक हे वानखेडे स्टेडियम मुंबई येथे भारत विरुद्ध इंग्लड दरम्यान टी-20 सामना पाहत असल्याचा फोटो व्हायरल झाला. यावर आता नेटकरी चांगलेच बरसले असून हा फोटो एडीट करुन नारायण मूर्ती यांना ट्रोल केले जात आहे. त्यांच्या ९० तास काम करण्याच्या संदर्भ या छायाचित्राला जोडला जात आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिभेला चांगलेच धुमारे फुटले आहेत.
काही निवडक कमेंटस् व मिम्स
- एका तेंडूलकर नावाच्या हँडल असलेल्या युजरने म्हटले आहे. ‘ नारायण मूर्ती त्यांचा रविवार एंन्जॉय करत आहेत, जे की एल ॲन्ड टी चे चेअरमन यांचे स्वप्न होते’.
- एका युजरने म्हटले आहे. ‘ही नारायण मूर्ती यांची खरी बाजू आहे ते रविवारी काम करत नाहीत’
- अनिरुद्ध नायक नावाच्या युजरने म्हटले आहे ‘मेरी तरफ ऐसे क्या देख रहा है, ७० घंटो का सप्ताह खतम करके दामात के साथ मॅच देखने आया हूँ
- एका युजरने सलमान खानच्या कॅरेक्टर ढिला है या गाण्याचा फोटो व मूर्ती यांचा फोटो एकत्र जोडून शेअर केला आहे.
- गोलमालमधील वसूलीभाईचा फोटो व मुर्तीं याचा फोटो एडिट करुन ‘ चूना लगा दीया’ असे इन्फोसिसचे कर्मचारी म्हणताहेत, असे कॅप्शन दिले आहे.