काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. 
राष्ट्रीय

प्रदेशाध्यक्षपदासाठी युवा चेहरा द्यावा; नाना पटोलेंची राहुल गांधींकडे मागणी

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि.११) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या नव्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेले काही दिवस नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती.

या भेटीदरम्यान नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी तरुण तडफदार चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केल्याचे समजते. दरम्यान काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरू आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. या बदलांमध्ये काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरील नियुक्त्याही बदलल्या जाणार आहेत. याच खांदेपालटादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नवे नाव घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT