Namita Thapar Trolling Row Pudhari
राष्ट्रीय

Namita Thapar: ‘मला सतत शिवीगाळ केली जातेय…’ नमिता थापर यांचं टीकाकारांना जोरदार उत्तर; काय आहे प्रकरण?

Namita Thapar Trolling Row: नमिता थापर यांनी नमाजच्या व्हिडिओवर झालेल्या ट्रोलिंगला ठाम उत्तर दिलं. त्यांनी धर्मापेक्षा परस्पर आदर महत्त्वाचा असल्याचा संदेश दिला.

पुढारी वृत्तसेवा

Namita Thapar Trolling Row: स्टार्टअप शो शार्क टँक इंडिया मधून ओळख मिळवलेल्या उद्योजिका नमिता थापर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगला थेट उत्तर दिलं आहे. नमाजच्या आरोग्यदायी फायद्यांवर त्यांनी केलेल्या पोस्टनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग आणि अपशब्दांचा सामना करावा लागला.

‘शांत राहणं आता शक्य नाही’

नमिता थापर यांनी एका व्हिडिओत सांगितलं की, सकाळी कामावर जाताना त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. “मला आणि माझ्या आईलाही सतत अपमानास्पद शब्दांनी हिणवलं जातंय,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत गप्प बसणं म्हणजे चुकीला प्रोत्साहन देणं आहे. त्यामुळे त्यांनी उघडपणे यावर बोलण्याचा निर्णय घेतला.

धर्मावर नाही, आरोग्यावर भर

त्या म्हणाल्या की, त्यांनी नमाजचे फायदे केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगितले होते. यापूर्वी त्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांवरही व्हिडिओ केले होते, पण त्यावेळी अशी प्रतिक्रिया आली नव्हती. “प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे,” असं स्पष्ट करत त्यांनी “R म्हणजे Religion आणि R म्हणजे Respect” हा मेसेज दिला.

ट्रोलिंगची मर्यादा ओलांडली

नमिता थापर यांनी मान्य केलं की, सार्वजनिक आयुष्यात असल्यामुळे ट्रोलिंग नवीन नाही. मात्र या वेळी मर्यादा ओलांडली गेली, असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी आवाज उठवला.

‘चुकीचं घडत असताना गप्प बसू नका’

त्यांनी लोकांना आवाहन केलं की, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. “गप्प राहणं म्हणजे चुकीला साथ देणं,” असं त्या म्हणाल्या. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी कर्मावर विश्वास व्यक्त करत, द्वेष पसरवणाऱ्यांना इशारा दिला की “देव सगळं पाहतोय.”

Lenskart वादाची पार्श्वभूमी

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर Lenskart संदर्भातील वादही चर्चेत आहे. कंपनीच्या एका जुन्या ‘स्टाईल गाईड’मुळे धार्मिक चिन्हांबाबत भेदभाव होत असल्याचे आरोप झाले होते. मात्र कंपनीचे सह-संस्थापक पियुष बन्सल यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरणं दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT