Namibia Cheetah Cubs: कुनो नॅशनल पार्कमधून आली गूड न्‍यूज : मादी चित्त्‍याने दिला चार बछड्यांना जन्म 
राष्ट्रीय

Namibia Cheetah Cubs: कुनो नॅशनल पार्कमधून आली गूड न्‍यूज : मादी चित्त्‍याने दिला चार बछड्यांना जन्म

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नामिबियातून १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणलेल्या कुनो नॅशनल पार्कमधील मादी चित्त्याने (Namibia Cheetah) चार बछड्यांना जन्म दिला आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी चार बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नामिबियातून (दक्षिण आफ्रिका) १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात ८ चित्ते आणण्‍यात आले होते. हे चित्ते सुमारे ८,००० किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले होते. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (KNP-केएनपी) ते सोडले. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२३ रोजी १२ चित्त्यांना आणले यामध्ये ७ नर आणि ५ मादी चित्त्‍याचा समावेश होता. आज केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी चार बछड्याचा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली की, १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात ८ चित्त्यातील एका मादी चित्याने चार बछड्यांना जन्म दिला.

Namibia Cheetah Cubs : सर्वांची प्रकृती उत्तम

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार, बछड्यांची प्रकृती उत्तम आहे. संवर्धन प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांनी ही घटना चित्त्‍यांच्‍या संगोपनासाठी सकारात्मक संकेत असल्याचे म्‍हटले आहे. कुनो नॅशनल पार्कमध्‍ये चित्त्यांच्या पुनरुत्पादनासाठी योग्य अधिवास म्हणून उद्यान तयार केले जात आहे.

नामिबियामधून भारतात आणलेल्या मादी चित्त्‍याचे २७ मार्च रोजी निधन झाले. मादी चित्ता 5 वर्षांची होती. तिचं नावा साशा असे ठेवण्‍यात आले होते. मागील काही दिवसांपासून ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT