वाराणसी : वृत्तसंस्था
वादग्रस्त ज्ञानवापी र संकुलातील व्यास तळघराच्या छतावर नमाजींच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणारी हिंदू पक्षाची याचिका वाराणसी न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून च लावली. तळघराचे छत जीर्ण झाले असल्याचे कारण नमूद करून त्याच्या दुरुस्तीची परवानगीही हिंदू ने पक्षाने न्यायालयाला मागितली होती. न्यायालयाने कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीला परवानगी देण्यासही नकार दिला.
व्यास तळघरात सूुरू असलेली पूजा यापूर्वीच्या न्यायालयीन आदेशानुसार सुरूच राहणार आहे. हिंदू पक्षाच्या याचिकेवर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हितेश अग्रवाल यांनी हा आदेश दिला. सध्या व्यास तळघराच्या छतावर नमाज अदा केली जाते आणि तळघरात पूजा केली सुरू जाते.
व्यास तळघराचे छत फार जुने असल्याने कमकुवत झालेले आहे. छतावरून पाणीही टपकते. तळघराचे खांबही कमकुवत झालेले आहेत.
छतावर नमाजींची गर्दी होत असल्याने छताचे आणखी नुकसान होत आहे. ते पडूही शकते, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला होता.
छत कमकुवत नाही. आम्ही वर्षानुवर्षे छतावर दिवसातून ५ वेळा नमाज अदा करत आहोत, असे मुस्लिम पक्षाकडून सांगण्यात आले. न्यायालयाने ते ग्राह्य मानले.