Nalanda Temple Stampede pudhari
राष्ट्रीय

Nalanda Temple Stampede: नालंदामधील माता शीतला देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू अनेकजण जखमी

Anirudha Sankpal

Nalanda Maa Sheetla Temple Stampede: बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा गावात माता शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. माता शीतला देवीच्या पूजेवेळी ही चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची तर मोठ्या प्रमणावर भाविक जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. या ठिकाणी रूग्णवाहिका दाखल होत असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दर्शनासाठी केली गडबड

मिळालेल्या माहितीनुसार चैत्र महिन्यातील शेवटच्या मंगळवारी नालंदा येथील शीतला देवी मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. मंदिरात पोलीस बंदोबस्त अत्यंत कमी होता. त्यातच काही भाविकांनी दर्शनासाठी गडबड करत रांग तोडली. भाविक एकमेकांच्या अंगावर चढू लागले. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला.

आठ भाविकांचा मृत्यू

या गोंधळामुळं शीतला देवी मंदिरात भाविक एकमेकांच्या अंगावर पडत होते. चेंगराचेंगरीची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आता बचाव कार्य सुरू केलं आहे. पोलिसांनी अनेक डझनभर लोकांना रूग्णालयात दाखल केलं आहे. यातील आठ लोकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. जवळपास ६ पेक्षा जास्त लोकं जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही जखमींची प्रकृती नाजूक झाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

राष्ट्रपतीही नालंदामध्येच

प्रत्यक्षदर्शींनी या घटनेला पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. चैत्र महिन्यात शीतला देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. तिथं पोलीस बंदोबस्त का नव्हता असा प्रश्न विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील नालंदामध्येच आहेत. त्या नालंदा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात सामील होण्यासाठी नालंदा इथं आल्या आहेत. त्यामुळं पोलिसांचा फौजफाटा विद्यापीठात जास्त असल्यामुळं शीतला देवी मंदिरात पोलिस बंदोबस्त तुटपुंजा ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT