अदर पुनावाला  File Photo
राष्ट्रीय

माझ्या पत्‍नीला पण रविवारी माझ्याकडे पाहणे आवडते !

Adar Poonawalla | अदर पुनावाला यांनी घेतली ‘एलॲन्डटी’ च्या चेअरमनांच्या वक्‍तव्याची फिरकी

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एलॲन्डटी चे चेअरमन एस. एन. सुब्रम्‍हण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करण्याच्या व बायकोला बघत बसण्याच्या वक्‍तव्याचा सर्वच स्‍तरातून निषेध होत आहे. अभिनेत्री दिपीका पदुकोण व प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या वक्‍तव्यावर प्रतिक्रीया दिल्‍या आहेत. समाज माध्यमांवर या वक्‍तव्यावर टीका होत आहे. ‘अमर उजाला’ने याविषयी वृत्त दिले आहे.

आता सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनीही सोशल मिडीयावर पोस्‍ट करून एसएन चंद्रशेखर यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला आहे. त्‍यांनी म्‍हटली आहे ‘ माझी पत्‍नी विचार करते की मी एक शानदार पती आहे व रविवारी माझ्याकडे पाहत बसणे आवडते पण कामाची गुणवत्ता यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.’ असे म्‍हणत त्‍यांनी चंद्रशेखरन यांच्या विधानाची फिरकी घेतली आहे.

महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही काल एका कार्यक्रमात म्‍हटले होते की किती तास काम करता याच्यापेक्षा किती गुणवत्तेचे काम करता हे महत्‍वाचे आहे. त्‍यांनी म्‍हटले होते की कामाच्या बाबतीत चाललेली ही चर्चा वेगळ्‍या दिशेने जात आहे. ४० तास, ७० तास किंवा ९० तास काम करावे की नाही यावर चर्चा होण्यापेक्षा किती गुणवत्तेचे काम केले हे महत्‍वाचे आहे.

दरम्‍यान एलएन्डटी चे चेअरमन सुब्रम्‍हण्यम यांनी आपल्‍या कर्मचाऱ्यांना म्‍हटलेहोते की ‘तुम्‍ही रविवारी काय करता, तुमच्या पत्नीला कितीवेळ बघत बसता. त्‍यापेक्षा कार्यालयात या व काम सुरु करा’ त्‍यांच्या या वक्‍तव्यामुळे कार्पोरेट जगतात खळबळ माजली होती. समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT