दिलीप खेडकर Pudhari Photo
राष्ट्रीय

‘विखे पाटलांच्या मुलाविरोधात निवडणूक लढलो म्हणून माझ्या मुलीची बदनामी केली’

पूजा खेडकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाविरोधात अहमदनगर दक्षिण मधून मी लोकसभा निवडणूक लढवली. म्हणूनच माझी मुलगी पूजा खेडकरची बदनामी करण्यात आल्याचा आरोप दिलीप खेडकर यांनी दिल्ली पत्रकार परिषदेत केला. माझ्याविरोधात या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला होता, म्हणून या अगोदर माध्यमांसमोर आलो नसल्याचे त्यांनी सांगितले. पूजा खेडकरवर करण्यात आलेले सर्वच आरोप खरे नसल्याचा दावा त्यांनी केला. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर म्हणाले की, पूजाचे आयुष्य उद्धवस्थ झाले आहे. माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. प्रस्थापितांना मी निवडणूक लढू नये असे वाटत होते. म्हणून या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते आहे म्हणून त्यांनी त्यांचा शासकीय अधिका-यांवर प्रभाव पडला आहे. मात्र, नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहीजे होता. तो मिळाला नसल्याचे ते म्हणाले.

दिलीप खेडकर म्हणाले की, युपीएससीने जे आरोप केले आहेत. त्यात युपीएससने म्हटले की पूजा खेडकर यांनी स्वतःच् नाव बदलले. परंतु तिने नाव बदलले नसल्याचा दावा त्यांनी केला. युपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली कारवाई केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पूजा खेडकर ही वंजारी आहे. तिचे ओबीसी प्रमाणपत्र खोटे नाही, त्या वर्गवारीत तिने परिक्षा दिली ते योग्य असल्याचे ते म्हणाले. पर्सन विथ बेंचमार्क मध्ये ३०-४० आजार आहेत. ॲाम्लोपिया हा आजार पूजा खेडकरला आहे. पीएच वर्गवारीत हा आजार २०१८ ला आला. दोन्ही वर्गवारीचे ॲटम्प्ट वेगवेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT