Mohan Bhagwat  pudhari
राष्ट्रीय

मुस्लीम RSS च्या शाखेत येऊ शकतात; पण...; मोहन भागवत यांनी ठेवल्या दोन अटी

Mohan Bhagwat: वाराणसी दौऱ्यात संघ स्वयंसेवकांशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुस्लीमांच्या RSS प्रवेशावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भागवत यांच्या या वक्तव्यावरून राजकारण आणि समाजकारणात खळबळ उडाली आहे.

मोहन भागवत सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी शहरातील माळढहिया येथील लाजपतनगर पार्कमध्ये RSS शाखेत उपस्थिती लावली. यावेळी भागवत यांनी हे वक्तव्य केले.

येथे संघस्वयंसेवकांशी संवाद असताना एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने मुस्लीम शेजाऱ्यांना संघात आणू शकतो का? असा सवाल केला. त्यावर जर मुस्लीमांनी स्वतःला औरंगजेबाचे वंशज मानले नाही आणि त्यांनी भारतमातेचा आदर केला तर मुस्लीमदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत सहभागी होऊ शकतात, असे वक्तव्य भागवत यांनी केले आहे.

RSS स्वयंसेवकाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भागवत म्हणाले की, जो भारतमाता की जय असा घोष करतो, जो भगव्या ध्वजाचा आदर करतो असा कोणताही व्यक्ती RSS च्या शाखेत सहभागी होऊ शकतो. शाखेत जात, धर्म किंवा भाषेवरून भेदभाव केला जात नाही.

केवळ एखाद्या व्यक्तीने स्वतःला भारतीय मानले पाहिजे आणि भारतमातेचा आदर केला पाहिजे. मात्र, जो स्वतःला औरंगजेबाचा वंशज मानतो, तो शाखेत सहभागी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT